Shetkari Karjamafi Yadi 2026
शेतकरी कर्जमाफी यादी २०२६ आणि ई-केवायसी प्रक्रिया

शेतकरी कर्जमाफी २०२६: १७ लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर! ई-केवायसी (e-KYC) कशी करावी?

जय शिवराय मित्रांनो! गेल्या काही दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ (Shetkari Karjamafi Yadi 2026) च्या याद्या कधी लागणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. ३० जून, ५ जुलै आणि २२ जुलै अशा अनेक तारखा उलटून गेल्यानंतर अखेर शासनाने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे.

सुरुवातीला केवळ ५३२ शेतकऱ्यांची प्रायोगिक यादी आली होती. मात्र, आता इन्कम टॅक्स (Income Tax) भरणारे शेतकरी वगळून, तब्बल १७ ते साडेसतरा लाख पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे! यासाठी १३,००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज खाते निरंक (Nil) करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.

माझी योजना (Majhi Yojana) च्या या लेखामध्ये आपण आपली कर्जमाफीची यादी कशी पाहायची, बँकेत किंवा CSC सेंटरवर जाऊन आधार ई-केवायसी (Aadhaar e-KYC) कशी पूर्ण करायची आणि कर्जमाफीची रक्कम खात्यात कशी जमा होईल? याची संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप (online process) माहिती घेणार आहोत.

📌 तुम्हाला हे माहित आहे का? शेतीची कामे करताना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी जशी कर्जमाफी महत्त्वाची आहे, तसेच ई-पीक पाहणी सुद्धा अत्यंत गरजेची आहे. यावर्षी ई-पीक पाहणीचे नवीन नियम आले आहेत. सविस्तर माहितीसाठी नक्की वाचा: नवीन ई-पीक पाहणी २०२६: DCS ॲप नोंदणी.

१. कर्जमाफी योजनेचे नवीन अपडेट आणि यादी (Shetkari Karjamafi Yadi 2026 Latest Updates)

अडचण काय होती? इन्कम टॅक्स भरणारे अपात्र शेतकरी या योजनेत येऊ नयेत म्हणून डेटा फिल्टर करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे याद्या प्रसिद्ध होण्यास उशीर झाला. आता हा डेटा प्राप्त झाल्यामुळे शासनाने राष्ट्रीयकृत बँका (Nationalized Banks), ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यास सुरुवात केली आहे.

सद्यस्थिती काय आहे (Ground Reality)?

  • पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर शासनाकडून “आपले कर्ज माफ झाले आहे, अभिनंदन! पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधा” असा SMS पाठवण्यास सुरुवात झाली आहे.
  • ज्यांचे मोबाईल नंबर लिंक नाहीत, त्यांच्या याद्या गावातील चावडीवर, ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर आणि बँकेच्या शाखांमध्ये लवकरच पाहायला मिळतील (येत्या सोमवारपर्यंत).
  • दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज (Over 2 Lakh Debt) असलेल्या सुमारे २ लाख ६९ हजार शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे, मात्र त्यांच्या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागू शकतो.

२. कर्जमाफीचे पोर्टल आणि CSC VLE लॉगिन

शासनाने कर्जमाफीसाठी flrs.maharashtra.gov.in हे अधिकृत पोर्टल सुरू केले आहे. मात्र, शेतकऱ्यांना स्वतः या पोर्टलवर लॉगिन करता येणार नाही. या पोर्टलवरील ई-केवायसी करण्याचे अधिकार केवळ शासनाने नेमून दिलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (CSC VLE) चालकांनाच आहेत.

⚠️ महत्त्वाची सूचना (CSC चालकांसाठी): VLE बांधवांनी FLRS पोर्टलवर थेट लॉगिन करू नये. ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला aaplesarkar.mahaonline.gov.in या पोर्टलवरूनच लॉगिन करावे लागेल.

VLE रजिस्ट्रेशन कसे करावे? (First Time Registration):

  1. ‘आपले सरकार’ पोर्टलवर VLE Login करा.
  2. डाव्या बाजूच्या मेनूमधून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ या टॅबवर क्लिक करा.
  3. जर तुम्ही पहिल्यांदाच हे उघडत असाल, तर “VLE User Not Registered” असा मेसेज येईल.
  4. तिथे तुमचा आधार नंबर टाका आणि बायोमेट्रिक (Fingerprint) द्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
  5. तुमचे नाव, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून फॉर्म Submit करा. तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

३. शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया कशी करावी? (Step-by-Step)

शेतकरी जेव्हा आधार कार्ड घेऊन सीएससी (CSC) सेंटरवर येतील, तेव्हा VLE ने खालीलप्रमाणे प्रक्रिया (Online Process) पार पाडायची आहे:

  1. शेतकऱ्याला सर्च करणे: आपले सरकार पोर्टलवर ‘कर्जमुक्ती योजना’ टॅबमध्ये जा. तिथे ‘विशिष्ट क्रमांक’ (Specific ID) किंवा ‘आधार क्रमांक’ (Aadhaar Number) टाकून शेतकऱ्याची माहिती सर्च करा.
  2. माहिती पडताळणी: स्क्रीनवर शेतकऱ्याचे नाव आणि आधार नंबर दिसेल. जर तो बरोबर असेल तर ‘Yes’ करा. (चुकीचा असल्यास ‘No’ करून बरोबर नंबर अपडेट करा).
  3. कर्ज रकमेची खात्री (Loan Amount): पोर्टलवर दिसणारी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्याला मान्य आहे का? (Loan amount acceptable?) हे विचारून ‘Yes’ वर टिक करा.
  4. घोषणापत्र (Declarations): स्क्रीनवर दोन घोषणापत्रे दिसतील. १. ई-केवायसीसाठी संमती आणि २. अपात्रतेच्या अटीत बसत नसल्याचे प्रमाणपत्र. या दोन्ही बॉक्सवर टिक (☑) करा.
  5. बायोमेट्रिक ई-केवायसी: ‘Aadhaar KYC’ बटनावर क्लिक करा. मशीनवर शेतकऱ्याचा अंगठा (Thumb) घेऊन केवायसी पूर्ण करा.
✅ पुढील प्रक्रिया: ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, शासनाकडून कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या संबंधित कर्ज खात्यात (Loan Account) वर्ग केली जाईल आणि खाते निरंक होईल.

४. तक्रार (Complaint) असल्यास काय करावे?

जर सर्च केल्यानंतर दिसणारा आधार क्रमांक चुकीचा असेल, किंवा पोर्टलवर दाखवलेली कर्जाची रक्कम शेतकऱ्याला मान्य नसेल, तर माहिती पडताळणीच्या वेळी ‘No’ हा पर्याय निवडा. त्यानंतर पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचा (Grievance Registration) पर्याय खुला होईल. तिथे योग्य ती माहिती भरून तुम्ही तक्रार शासनाकडे पाठवू शकता.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१. कर्जमाफीची यादी कुठे पाहायला मिळेल?

सध्या पात्र शेतकऱ्यांना SMS येत आहेत. तसेच याद्या ग्रामपंचायत कार्यालय, बँकांचे नोटीस बोर्ड आणि आपले सरकार सेवा केंद्रांवर उपलब्ध केल्या जात आहेत.

२. शेतकरी स्वतः मोबाईलवरून ई-केवायसी करू शकतात का?

नाही. ही केवायसी केवळ बायोमेट्रिक पद्धतीने (अंगठा लावून) ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ (CSC) करता येते.

३. केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

शेतकऱ्याला आपले मूळ आधार कार्ड (Aadhaar Card) आणि यादीत आलेला विशिष्ट क्रमांक (Vishishta Kramank) सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

४. २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांचे काय?

२ लाख ६९ हजार शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचाही या योजनेत समावेश आहे, मात्र त्यांच्या कर्ज परतफेडीचे निकष लवकरच स्पष्ट होतील.

५. कर्जाची रक्कम चुकीची दाखवत असेल तर काय करावे?

केवायसी करताना ‘Loan amount acceptable?’ या पर्यायावर ‘No’ सिलेक्ट करून तुम्ही पोर्टलवर रीतसर तक्रार (Complaint) नोंदवू शकता.

६. नियमित कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम मिळेल का?

शासनाने अद्याप याची अधिकृत घोषणा केली नसली तरी, ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी जोराने सुरू आहे आणि लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे.

७. CSC VLE ला Registration एरर येत असेल तर काय करावे?

आपले सरकार पोर्टलवर कर्जमुक्ती टॅबमध्ये जाऊन स्वतःचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून प्रोफाईल पुन्हा सबमिट करावे.

८. FLRS पोर्टलचे पूर्ण नाव काय आहे?

FLRS म्हणजे Farmer Loan Relief System (शेतकरी कर्जमुक्ती प्रणाली) जे महाराष्ट्र शासनाने विकसित केले आहे.

९. या योजनेचे अधिकृत नाव काय आहे?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६.

१०. ई-केवायसी केल्यानंतर पैसे कधी जमा होतात?

ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर पडताळणी होऊन शासनाकडून काही दिवसांतच थेट कर्ज खात्यात रक्कम वर्ग केली जाते.


थोडक्यात पण महत्त्वाचे (Conclusion)

शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजनेची प्रक्रिया आता अत्यंत वेगाने सुरू झाली आहे. जर तुम्हाला शासनाचा SMS आला असेल किंवा यादीत नाव असेल, तर कसलाही विलंब न करता जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

आम्हाला नक्की सांगा: तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले आहे का? ई-केवायसी करताना तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत आहे का? तुमचा अनुभव किंवा प्रश्न खाली कंमेंट करून नक्की सांगा!

अशाच खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहितीसाठी Majhi Yojana शी जोडलेले राहा!